वरोरा/ ग्यानीवंत गेडाम
वरोरा शहरातील अरविंद विद्या निकेतन शाळेत ८ सप्टेंबर ला तालुका विधी सेवा समितीच्या उपस्थित जागतिक साक्षरता दिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी चहारे,ऍड.देशपांडे,ऍड.कुतरमारे,ऍड.
लोया मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव राऊत ,प्राचार्य पिजदूरकर,उपप्राचार्य स्मिता घडोले, यांच्या उपस्थित पार पडला.
साक्षरता दिनाच्या निमित्याने अरविंद विद्या निकेतन शाळेत साक्षरतेचे महत्व सांगून आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर होणाऱ्या साक्षरता मोहिमे अंतर्गत येणाऱ्या जागतिक साक्षरता दिवसांवर मार्गदर्शन करून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुरवातीला गटशिक्षणाधिकारी सर आणि उपस्थित मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सर्वप्रथम गटशिक्षणाधिकारी चहारे यांच्या संबोधनंतर वर्ग ८ व ९ च्या विद्यार्थ्यानी तबला ,ढोलकी,आणि हार्मोनियम च्या तालावर सुरेख स्वागतगीत सादर करून आथितींचे स्वागत केले.
ऍड.देशपांडे यांनी जागतिक साक्षरता दिवस का मानतात यासंबंधी माहिती दिली.तसेच ऍड.लोया मॅडम यांनी साक्षरता दिवसाचे महत्व आणि त्यामागचे कारण सांगितले.यामध्ये त्यांनी लाकुतोड्या ची कहाणी सांगून विद्यार्थ्यास मंत्रमुग्ध केले.विषयाशी संबंधित अनेक छोट्या कहाण्या सांगून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकली.ऍड.कुतरमारे यांनी तर साक्षरता दिवसाचा संपूर्ण इतिहास आणि त्याचा सामान्य माणसाच्या आयुष्यात त्याचे महत्व सांगून बऱ्याच जीवनावश्यक गोष्टी हसत-खेळत सांगितल्या.त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व जोशपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना अनेक उदाहरणे सांगून प्रौढ शिक्षण कसे सुरू झाले.त्याचे फायदे आणि शिक्षणाचा अधिकार कसा प्रत्येक भारतीयांना मिळावा आणि त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असू असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
त्यानंतर विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले.विद्यार्थ्यानी समाजसेवी व्यक्तिमत्वाचे सादरीकरण केले.जिजामाता,राणी लक्ष्मीबाई,अहिल्याबाई होळकर,डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण,स्वामी विवेकानंद यांची भूमिका वटविली.तर दहावीच्या विद्यार्थिनींनी शिक्षणाचे महत्व सांगणारी लघु नाटिका सादर केली.
कार्यक्रमाची सांगता शाळेच्या उपप्राचार्य
स्मिता घडोले यांनी केले.
0 Comments