Ticker

6/recent/ticker-posts

*हळदा येथील अवैध दारू विक्री बंद करा..!!*अन्यथा तीव्र आंदोलन l Chandrapur l Maharashtra l daru Bandi





*अवैध दारू विक्री बंद न झाल्यास तंटामुक्त समिती व हनुमान देवस्थान समितीचा आंदोलनाचा इशारा*..... *ठाणेदारांना निवेदन*brahmapuri

ब्रम्हपुरी:-तालुक्यातील शेवटच्या टाेकावर असलेल्या हळदा येथील शासकिय कार्यालये व धार्मिक स्थळाजवळील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी हळदा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समिती,हनुमान देवस्थान समिती, ग्रामपंचायत कार्यालय,शालेय व्यवस्थापन समिती,प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने पुढाकार घेऊन येत्या आठ दिवसात ग्रामपंचायत कार्यालय समाेरील अवैध दारूची दुकाने बंद न झाल्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहुन गावात सदैव शांतता नांदावी,येणारी भावी पिढी चांगली निर्माण व्हावी.या उदात्त हेतुने १ अाॅगस्ट २०२२ ला ग्रामपंचायत कार्यालय हळदा येथे एकत्र येऊन यापुढे गावातील शासकीय कार्यालये, धार्मिक स्थळाच्या परिसरातील खुलेआम सुरू असलेली दारू विक्रीस प्रतिबंध करण्याचे तसेच १८ वर्षाखालील मुलांना काेणत्याही पानठेल्यावर खर्रा व तत्सम तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस मनाई करण्याचे ठरविण्यात आले व याची अंमलबजावणी हाेण्याकरीता गावात जनजागृती करण्यात आली. त्याचाच भाग म्हणून अवैध दारूविक्रेते व पानठेले धारक यांचे साेबत चर्चा केली असता त्यांच्याच सहकार्याने गेल्या कित्येक वर्षांपासून शासकीय कार्यालये,धार्मिक स्थळाजवळील राजराेसपणे सुरू असलेली अवैध दारूविक्री व खर्रा विक्री बंद झाली मात्र पुन्हा गेल्या आठ दिवसापासून गुंड प्रवृत्तीच्या अवैध दारूविक्रेत्यांनी बळजबरीने,राजराेसपणे पुन्हा शासकीय कार्यालये,धार्मिक स्थळाच्या परिसरात अवैध दारूविक्री सुरू केली.सर्व समितीचे पदाधिकारी यांनी समजावून सांगूनही "आमचे काेणीच काहीही वाकडे करू शकणार नाही" असे अवैध दारूविक्रेत्यांना वाटत आहे.


गावात मध्यवर्ती भागात ग्रामपंचायत कार्यालय व हनुमान मंदिर असुन याच ठिकाणी गुजरी भरत असल्याने महिला,मुली, प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी येत असतात ,अवैध दारू विक्रेत्यांचा व दारू पिणा-यांचा या ठिकाणी हाेत असलेला त्रास बघता तात्काळ या ठिकाणी असलेली अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी हाेत आहे.
गावात १ते १० पर्यत शाळा असुन यावर्षी गावातील सर्व विद्यार्थ्यांना लाेकसहभागातुन जवळपास ९० हजार रूपये गाेळा करून बुट,साॅक्स व ओळखपत्राचे वितरण केले. तसेच यावर्षी शांततेत बैल पाेळा व तान्हा पाेळा उत्सव साजरा करून शेतकऱ्यांना व बालकांना पारितोषिक देण्यात आले. यावर्षी प्रथमच गावात बैल पाेळ्याला जुगार बंद करून गावाने एक आदर्श निर्माण केला.मात्र अवैध दारूविक्रेत्यांनी ग्रामपंचायत समाेरच अवैध दारू सुरू करून पुन्हा गावात गालबाेट व अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत.असे प्रगतीशील प्रयाेग गावात हाेत असताना या मुबलक प्रमाणात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीमुळे युवक,लहान मुले या दारू व खर्रा च्या आहारी जात असुन भविष्यात फार माेठे संकट उभे राहु शकते त्यामुळे गावातील ग्रामपंचायत समाेरील अवैध दारूची दुकाने तात्काळ बंद करण्याच्या मागणीचे निवेदन ब्रम्हपुरीचे पाेलिस निरिक्षक राेशन यादव यांना देण्यात आले.
निवेदन देतांना दाैलत गरमळे सरपंच हळदा,लुमदेव खेवले अध्यक्ष तंटामुक्त समिती, लतिफ लाेणारे अध्यक्ष शा.व्य.समिती,संजय लाेणारे,ज्ञानेश्वर झरकर,केशव राऊत,सुरेखा राऊत,ज्याेतीताई भाेयर, धनराज लाेणारे,विलास सावकार राऊत आदी उपस्थित हाेते.

Post a Comment

0 Comments