Ticker

6/recent/ticker-posts

*आयांनो, लेकी-बाळी सांभाळा बलात्कारी मोकाट आहेत !* *दत्तकुमार खंडागळे* संपादक वज्रधारी, मो. 9561551006 l Maharashtra l India l




*दत्तकुमार खंडागळे* संपादक वज्रधारी, मो. 9561551006

गुजरात येथील बिल्कीस बानो प्रकरणात जे घडलय ते भयंकर आहे. खरतर देशाची व देशातल्या जनतेची चिंता वाढवणारे आहे. न्यायाला जर असे दिवसाढवळ्या घोडे लावले जाणार असतील तर उद्याच्या भारताची वाटचाल कशी असणार आहे ? ते स्पष्ट होते. ज्या नराधमांनी एका गर्भवती महिलेवर बलात्कार करून खून केलेत, अतिशय क्रुरपणे अत्याचार केलेत, विशेष म्हणजे कोर्टाने त्यांना जन्मठेपेची सजा सुनावली आहे अशा हरामखोरांची सरकार सुटका करते. त्यांची सुटका झाल्यावर त्यांचे जाहिर सत्कार केले जातात, त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला जातो. एखादे युध्द जिंकून आलेल्या वीरांचे जसे कौतुक होते तसे कौतुक या नराधमांचे करण्यात आले. देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्चाहत्तर वर्षे झाली पण बलात्का-यांचे अशा पध्दतीने उद्दात्तीकरण आजवर कुणीच केले नाही. आजवरच्या कुठल्याच सरकारने व कुठल्याच पक्षाने असली नालायकी केली नाही. विशेष म्हणजे या देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री स्त्री दाक्षिण्याच्या नेहमी लांब लांब गप्पा ठोकतात. त्यांनी ज्या दिवशी स्त्री सन्मानाबाबत लाल किल्यावरील भाषणात गप्पा ठोकल्या त्याच दिवशी हे नराधम गुजरात सरकारने मोकाट सोडले. स्त्री सन्मानाचे त्यांचे भाषण हवेत विरते न विरते तोवर गुजरात राज्यात बलात्कारी नराधम त्यांच्याच सरकारने मोकाट सोडले. या इतक्या मोठ्या भयंकर आणि विकृत घटणेवर तथाकथित स्वच्छतेचा, संस्कृतीचा दावा करणा-या बीजेपी पक्षातल्या एकानेही तोंड उचकटले नाही. हागल्या-मुतल्यावर नैतिकतेचा आव आणत टेंभा मिरवणा-या महाराष्ट्रातील भाजपच्या वाचाळवीरांनीही यावर थोबाड उघडले नाही. स्वत:ची स्वत:लाच लाज यावी, माणूसपणाची शरम वाटावी अशा प्रकारावर या सगळ्या वाचाळवीरांना बोलावे वाटले नाही. आपले मत व्यक्त करावे वाटले नाही. या सर्वांच्या साळसुदपणाचा, नैतिकतेचा व सुसंस्कृतपणाचा गर्भपात झाला आहे की त्यांच्या सदसदविवेक बुध्दीला कोरोना झाला आहे ?

भाजप नेत्या खुशबू सुंदर यांनी बिल्कीस बानो प्रकरणावर व्यथीत मनाने आपल्या भावना व्यक्त केल्या. "मी जर आज बिल्कीस बानो सोबत उभी नाही राहिले तर स्वत:ला स्त्री म्हणून माफ नाही करू शकत !" असं त्या म्हणाल्या. महाराष्ट्रात विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या सहमतीने झालेल्या, केलेल्या भानगडीवरसुध्दा टेंभ्यात बोलणा-या वाघ बाई यावर 'ब्र' शब्द काढताना दिसल्या नाहीत. त्यांच्या नैतिकतेला, सुसंस्कृतपणाला व  त्यांच्यातल्या बाईपणाला याची घृणा वाटली नाही की  याचा राग आला नाही. चित्रा वाघ यांनी स्वत:मधल्या आईच्या नजरेला नजर देवून पहावे, स्वत:मधल्या बाईच्या नजरेला नजर देवून पहावे, तिच्या डोळ्यात डोळे घालून  पाहताना जर त्यांना स्वत:ची स्वत:ला लाज नाही वाटली तर त्या माणूसपणाच्याही खाली घसरल्या आहेत असे समजायला हरकत नाही. त्यांच्या धडाकेबाज कामाबद्दल, व्यक्तीमत्वाबद्दल  नितांत आदर वाटतो. त्या राष्ट्रवादीत असतानाही तो होता आणि आजही आहे.  पण त्यांच्यासारख्या कर्तृत्वसंपन्न, स्वावलंबी स्त्रिया सत्तेच्या तुकड्यासाठी लाचार होवून मेंदूला गहाण टाकत असतील, कसल्याही नालायकीला मुकसंमती देत असतील, त्यावर एक स्त्री म्हणूनही व्यक्त होणार नसतील तर तो 'स्त्री' त्वाचा अवमान आहे. सत्तेसमोर सत्तेच्या तुकड्यासाठी आशाळभुतपणे शेपूट हलवणा-या या सर्व भाजपेयी मंडळींची नैतिकता, सुसंस्कृतपणा दांभिक आहे. ही मंडळी सत्तेच्या तुकड्यांसाठी  विरोधकांवर नैतिकतचे आरोप करताना दिसतात. हे आजवर महाराष्ट्राने अनेकवेळा अनुभवलय. संजय राठोडवर घसा काढणारे फडणवीस आज त्याच संजय राठोडसोबत मंत्रीमंडळात खांद्याला खांदा लावून बसत आहेत. संजय राठोड सोबत बसताना त्यांना लाज कशी वाटत नाही ? जनता आपल्याला जाब विचारेल, प्रश्न विचारेल याची भितीही या कोडग्यांना का वाटत नाही ? 'स्व' पक्षातल्यांनी काहीही केले, कशीही घाण केली तर त्याला 'विष्ठा' न समजता पंचामृत समजतात की काय हे लोक ? भाजपवाले हागले तरी मिटक्या मारत खाणारे, सोशल माध्यमात त्यांचे बिनडोकपणे समर्थन करणारे, इतरांच्या नैतिकतेवर, संस्कृतीवर आणि सभ्यतेवर बोलणारे भक्त याबाबत चिडीचुप आहेत. ते ही यावर तोंड उचकटत नाहीत. संजय राठोड शिवसेनेत असताना त्याच्या लफड्यावर नाक उचकाटून बोलणारे या बलात्का-यांच्या स्वागतावर, उदात्तीकरणावर अजिबात बोलले नाहीत, व्यक्त झालेले नाहीत. त्यांच्या मेंदूला लाचारीचा, मुर्खपणाचा आणि अंधपणाचा आजार पुर्वीच जडलाय. ते काय यावर बोलणार आहेत ? त्यांच्याकडून याची अपेक्षा कशी करावी ? भविष्यात त्यांच्या घरी असं काही झाले तर देवाचा आशिर्वाद मिळाला म्हणून भक्त समर्पित भावाने कृतकृत्य झाल्याची भावना व्यक्त करणार का ? या गोष्टीचे समर्थन करणार का ? विषय केवळ बिल्कीस बानोचा नाही तर संकटात आलेल्या भारतीयत्वाचा आणि मानवतेचा आहे.

  जे लोक मनूस्मृतीचे गोडवे गातात. मनूस्मृतीला संविधान मानतात. मनूस्मृतीचे राज्य आणण्याची विकृत स्वप्ने पाहतात त्या बदमाषांनी मनूस्मृतीचे निट वाचन करावे. त्या मनूस्मृतीत काही वचने आहेत ती पुन्हा पुन्हा  डोळ्याखाली घालावीत. सभा-समारंभात संस्कृतीच्या पांचट, फुसकट गप्पा झोडताना "यत्र नार्यस्तू पुज्यन्ते रमन्ते तत्र देवत: ।" हे वचन सांगतात. हे वचन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांनी अनेकदा सांगितले आहे. या वचनाचा अर्थ असा होतो की, जिथे नारीचा सन्मान केला जातो तिथेच देवता वास करतात. हे वचन सांगणा-या संस्कृतीच्या तथाकथित ठेकेदारांनीच ही बदमाषी केली आहे. नरेंद्र मोदींनी या वचनाला अनुसरूनच स्वातंत्र्यदिनाला बकवास केली पण ते त्यांचे ढोंग होते.  या लोकांच्या मनात स्त्री बद्दल जरासुध्दा आदर असता तर त्यांनी असे केले नसते. मोदींनी मुग गिळले नसते. मनूस्मृतीतल्या सदर वचनात अजून एक ओळ आहे. "यत्रैतास्तु न पुज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया ।  हे त्या वचनातले दुसरे कडवे आहे. याचा अर्थ असा होतो जिथे 'स्त्री' चा सन्मान होत नाही, आदर केला जात नाही तिथे केलेली सगळी चांगली कर्मे नष्ट होतात. याच मनूस्मृतीत याच अर्थाचे अजून एक वचन आहे. "शोचन्ती जामया यत्र विनश्यत्याशू तत्कुलम ।
 न शोचन्ती तु यत्रैता वर्धते तध्दि सर्वदा ।। म्हणजे जिथे स्त्रीला कष्ट होतात, त्रास होतो, दु:ख होते ते कुळ नष्ट होते व जिथे स्त्री प्रसन्न असते तिथे सदैव भरभराट राहते. मनूस्मृतीच्या पाखंडी समर्थकांनी याचे तरी भान ठेवावे. विद्यमान संविधान नाकारत मनूस्मृतीला संविधान करण्याची स्वप्ने पाहणा-या बदमाषांनी ते तरी नीट समजून घ्यावे. स्वत:च्या  वागण्यातला दांभिकपणा, जातीय अहं, सत्तेचा माज आणि मस्तीला आवर घालावा, जमिनीवर रहावे. एक दिवस ज्याचा त्याचा हिशोब होतो. जैसे ज्याचे कर्म तैसे त्याचे फळ निश्चित आहे. भाजपवाल्यांनी माजू नये. सत्तेच्या जोरावर इतकी मस्ती येवू देवू नये अन्यथा काळ माफ करणार नाही. आजवर अनेक राजे-महाराजे, चक्रवर्ती सम्राट मातीत गेलेत. तुम्ही आज सत्तेत असाल पण तुमची सत्ता शाश्वत नाही,  अजरामर नाही. साल्यांनो तुुम्हालाही त्याच वाटेने जायचे आहे. भक्तांच्या ढोंगाड 'बा' ला याचे भान यावे इतकीच अपेक्षा. आयांनो सावध व्हा. या नालायकांनी संस्कृतीच्या गप्पा मारत बलात्कारी मोकाट सोडले आहेत. त्यांना तुरूंगातून मोकाट सोडत त्यांचा सत्कार केला आहे. फुलं टाकून त्यांचे उदात्तीकरण केले आहे. राम लंका जिंकून आल्यावर असा थाट केला नसेल असा थाट बलात्का-यांचा केला आहे. असे असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी किंवा त्यांच्यासोबतची पिलावळ यावर ब्र शब्द काढत नाही. त्यांच्याच पक्षाचे नेते, त्यांच्याच राज्यातले सरकार ही हरामखोरी करतात. हे भयंकर आहे. आयांनो आपल्या लेकी-बाळी सांभाळा, तुम्हीच काळजी घ्या. हे बलात्कारी मोकाट आहेत. त्याहूनही बलात्का-यांचे उदात्तीकरण करणारे नालायक लोक सत्तेत आहेत. त्यांचीच सत्ता आहे तेव्हा आपल्या लेकी-बाळींची स्वत:च काळजी घ्या.

Post a Comment

0 Comments