Ticker

6/recent/ticker-posts

सामाजिक कार्यकर्ते संतोष कूळमेथे, प्रदीप गेडाम ह्यांना अटक पूर्व जमीन मंजुर बिरसा मुंडा स्मारक साठी केले होते आंदोलन#rajura







संतोष कुळमेथे
राजुरा तालुका प्रतिनिधी

चंद्रपूर येथील जिल्हाअधिकारी कार्यालय समोर बसवण्यात आलेल्या क्रांतीसुर्य बिरसा मुंडा ह्यांचा पुतळ्याला स्थानिक प्रशासनच्या वतीने काही कागदपत्रे कमी असल्याने सकाळी पहाटे उचलण्यात आले. ही बातमी वाऱ्यासारखी पूर्ण राज्यात परसली.
जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते जमा होऊन मोठे जन आंदोलन सुरू करण्यात आले, विविध संघटना,राजकीय पक्ष,सामाजिक संघटना,ह्यांनी आंदोलनास पाठिंबा देत होते. आ.सुधीर मुनगंटीवार ह्यांनी पुढाकार घेऊन जिल्हा अधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी महानगर पालिका चंद्रपूर, पोलिस अधीक्षक चंद्रपूर ,व महसूल विभागाचे अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते ह्यांची बैठक लावून जागा हस्तांतर व बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरण त्वरीत कारवाई करून करून देण्याचे निर्देश देण्यात आले.
सलग तीन महिने वाट बघूनही काम होताना दिसत नव्हते , कागदपत्र तहसील कार्यालय चंद्रपूर तयार होत नव्हते ,सामाजिक कार्यकर्ते अशोक तुमराम,संतोष कुळमेथे,प्रदीप गेडाम ह्यांनी विचारपूस करायला गेले असता तेथील कर्मचारी सोबत शाब्दिक वाद झाला. त्यात ipc 353,427,506,188,269,270,34. 3,3. 51b
बॉम्बे ॲक्ट 135 असे विविध गुन्हे दाखल करण्यात आले.अशोक तुमराम ह्यांनी आधीच अटक पुर्व जमीन घेऊन आपली केस ही वेगळी केली. संतोष कुळमेथे जिल्हाध्यक्ष बिरसा क्रांती दल चंद्रपूर, प्रदीप गेडाम जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवा चंद्रपूर.ह्यांचा विरोध अटक वॉरंट काढण्यात आले.
दी ८ऑगस्ट रोजी दोन्ही सामाजिक कार्यकर्ते ह्यांची बाजू न्यायलायात नामवंत वकील ॲड सागोरे ह्यांनी मांडून अटक पूर्व जमीन मंजुर मिळवून दिला.

Post a Comment

0 Comments