प्रतिनिधी
तालुक्यातील शेवटचे टोक व गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या जुनगावला गेल्या नऊ ऑगस्ट पासून पुराने वेढले होते. आज दिनांक 14 ऑगस्ट रोजी पुराचे पाणी कमी झाल्याने पुलावरून रहदारी सुरू होणार अशी आशा नागरिकांना वाटत आहे. सध्या मात्र पुलावर अर्धाक फूट पाणी वाहत असल्याचे नागरिकांनी सांगितले. सकाळचे दहा वाजेपर्यंत हे सर्व पाणी ओसरून पूल रहदारीसाठी मोकळा होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.