Ticker

6/recent/ticker-posts

l CCTV camera l pombhurna l Chandrapur l पोंभूर्णा शहरातील तिसरा डोळा बंद- -सुरक्षा वाऱ्यावर, नगरप्रशसानाचे दुर्लक्ष



पोंभूर्णा :- वाढत्या गुन्हेगारीवर अंकूश ठेवण्यासाठी शहरातील विविध चौकात चार वर्षांपुर्वी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे व पब्लिक अलाउसमेंट सिस्टीम शोभेची वस्तु झाली आहे.
शहरातील महत्वपूर्ण ठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यांपैकी एक ही कॅमेरा व सिस्टीम कार्यरत नसल्याची माहिती आहे. नगर पंचयातने विशिष्टपुर्ण योजनेतून तब्बल ६६ लाख ३८ हजार २६५ हजार रुपयांचा खर्च केला. पंरतु याचा उपयोग कुणालाही झाला नाही.नगर पंचयातच्या वतीने विशिष्टपुर्ण योजने अंतर्गत २०१८-१९ मध्ये चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निश्चित करण्यात आले. या कामासाठी जिल्हा नियोजन समितीने ६६ लाख ३८हजार २६५ हजार रुपयांचा खर्चाला मंजूरी प्रदान केली. त्यानंतर तांत्रिक मान्यता मिळवून एका कंत्राटदाराला सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे कंत्राट देण्यात आले. शहरातील १७ चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. देखभाल दुरुस्तीसाठी १८ लाख ५० हजार २८४ व्यवस्थाही करण्यात आली होती. या कॅमेरांचा नियंत्रण कक्ष नगर पंचयात व पोलिस स्टेशन येथे निर्माण करण्यात आला. यातून संपूर्ण शहरावर तिसया डोळ्यातून लक्ष ठेवणे सुरु झाले. पोलीस प्रशासनाला आरोपींचा शोध घेण्यास मोलाची मदत होवू लागली. परंतु देखभाल दुरुस्ती अभावी हे कॅमेरे चालेनासे झाले. आता नादुरुस्ती झालेल्या कॅमेराकडे कुणी लक्षही देत नाही. शहरातील ५५ पैकी एकही कॅमेरा सुरु नसुन नगरपंचायतने नामवंत कंपनीचे कॅमेरे खरेदी केले असतांना काही महिन्यातच कॅमेरे नादुरुस्त झाले. पब्लिक अलाउन्समेंट सिस्टीम नादुरुस्त त्यामुळे कॅमरेच्या व क्लासमेट सिस्टीमच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या बाबत चौकशी करुन संबंधितावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शिवाजी चौक, जुना बाजार चौक,नगरपंचयात चौक, गांधी चौक, हनुमान चौका, महात्मा फुले चौक, डॉ.आंबेडकर चौक, आदिवासी चौक, अस्तिक चौक, राजराजेश्वर मंदीर चौक, तहसिल कार्यालय,पोलिस सटेशन कडे ,गोंडपिपरी रोड, विकास नगर चौक
-------
शहराच्या सुरक्षेकरिता नगरपंचयात ने लाखो रुपये खर्च करुन शहरातील मुख्य चौकात कॅमेरे बसविले परंतु कॅमेरे व अलाउन्समेंट सिस्टीम निकृष्ट दर्जाचे असल्याने बंद पडले आहेत.संबधित कंत्राटदारवर कारवाई करावी.कॅमेरे बंद असल्याने भविष्यात महिलांच्या सुरक्षिततेेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

-आशिष कावटवार
विरोधी पक्ष गटनेता न.पं.पोंभूर्णा

Post a Comment

0 Comments