चंद्रपूर (सावली) :-

७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत पंचायत समिती सावली, सरपंच संघटना,ग्रामसेवक संघटना व शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १८/०८/२०२२ रोज गुरुवार ला ठिक सकाळी ११.०० वाजता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह पंचायत समिती सावली येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले दरम्यान ३८ रक्तदात्यांनी रक्तदान करून देशभक्तीची प्रचिती दिली.
दिनांक १३/०८/२०२२ ते १५/०८/२०२२ पर्यंत तिन दिवसीय स्वातंत्र्ययाचा अमृत महोत्सव निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम, आरोग्य तपासणी शिबिर,परिसंवाद कार्यक्रम,देशभक्तीपर गित गायन स्पर्धा, शालेय विद्यार्थी व महिला बचत गटाचे सांस्कृतिक कार्यक्रम तथा स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार समारोह कार्यक्रम मोठ्या थाटामाटात उत्साहाने साजरे करण्यात आले.शालेय विद्यार्थ्यांचे परिसंवाद व समुह गायन स्पर्धेत सहभागी तसेच सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सदर शिबिराचे उद्घाटन मा. प्रशित पाटील तहसीलदार साहेब तहसील कार्यालय सावली यांच्या शुभहस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुनिता मरस्कोल्हे मॅडम प्रशासक तथा गट विकास अधिकारी पंचायत समिती सावली. प्रमुख अतिथी श्री. संतोष तंगडपल्लीवार माजी सभापती जि. प. चंद्रपूर, श्री. विजय कोरेवार माजी सभापती पं.स.सावली, श्री. सुशील आडे सहा.गट विकास अधिकारी, श्री. लोकनाथ खंडाळे गट शिक्षणाधिकारी, श्री. पुरूषोत्तम चौधरी अध्यक्ष सरपंच संघटना सावली. सर्व ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी, सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, त्याचप्रमाणें सर्व स्वयंसहायता बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
 
      सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नवनीत कंदालवार केंद्रप्रमुख सर यांनी केले तर प्रास्ताविक लोकनाथ खंडाळे गट. शिक्षणाधिकारी साहेब यांनी केले तर आभार आर.जि.परसावार वि. अधिकारी साहेब यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीचे सर्व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेत मोलाची कामगिरी बजावली.