Ticker

6/recent/ticker-posts

*आजादी का अमृत महोत्सव निमित्त उमरी पोतदार येथे भव्य रॅलीचे आयोजन#independent day celebration




पोंभूर्णा :- उमरी पोतदार दिनांक : १०/०८/२०२२ 'हर घर तिरंगा' मोहिमेल मजबूती देण्यासाठी सरकार विविध प्रयत्न करत आहे. भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव प्रत्येक गावात, शहरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. 


भारताला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यासाठी 'आझादी का अमृत महोत्सव' कार्यक्रम सुरू आहे. याअंतर्गत 'हर घर तिरंगा' अभियान सुरू आहे. 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत १३ ते १५ ऑगस्टपर्यंत सलग तीन दिवस राष्ट्रध्वज फडकवला जाईल. याचीच जनजागृती करण्याकरिता उमरी पोतदार येथे भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले. रॅली च्या माध्यमातून गावामध्ये जनजागृती करण्यात आली आहे. आझादी का अमृत महोत्सव निमित्य उप पोलीस स्टेशन उमरी पोतदार व ग्रामपंचायत उमरी पोतदार यांच्या संयुक्त विद्यमाने हर घर तिरंगा रॅली उपक्रम राबविण्यात आला असून सदर रॅली मध्ये उप पोलीस स्टेशन उमरी पोतदार चे पोलीस स्टाफ, ग्रामपंचायत चे कार्यालयीन कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, जि. प्र. शाळा उमरी पोतदार चे विद्यार्थी इतर शिक्षक वर्ग, राणी दुर्गावती विद्यालय तथा राजीव गांधी कनिष्ठ कला महाविद्यालय उमरी पोतदार येतील विद्यार्थी इतर शिक्षक वर्ग व गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. सदर रॅलीचे मार्गदर्शन मा. श्री. किशोर शेरकी ठाणेदार , सरपंच मा. सौ. ठाणेश्वरी लेनगुरे, उप सरपंच श्री मंगेश उपरे, श्री देऊरमल्ले सर, श्री. चनकापुरे सर, श्री कदम सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments