दर्शन मोंडकर, रा. ठाणे यांच्या वाॅलवरून...
*प्रिय एकनाथ शिंदे,*
*उद्धव ठाकरे हिंदुत्वापासून दूर गेल्याचा दावा तुम्ही केला आहे.*
आणि तुमच्या या विधानाबद्दल तुम्हाला विचारावसं वाटतं..
*तुमचा हिंदुत्वाचा ब्रँड नेमका काय आहे???*
उद्धव ठाकरे हे २.५ वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यापैकी २ वर्षे महाराष्ट्र आणि संपूर्ण देश कोरोना साथीच्या रोगाने ग्रासलेला पाहिला आणि तरीही,
महाराष्ट्रातील नद्यांमध्ये एकही मृतदेह तरंगताना दिसला नाही.
१०० मृतदेह एकमेकांवर ठेवून जळणाऱ्या चिता आपण या राज्यात पाहिल्या नाहीत.
हजारो किमी चालत इथली लोकं घरी पोहचली नाहीत किंवा त्यातून मेलेले नाहीत.
रेशन उपलब्ध नसल्यामुळेही इथे कुणी अन्नावाचून राहिलं नाही.
इथे ऑक्सीजनची कमतरता भासली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी ९० टक्के औद्योगिक ऑक्सीजनचा पुरवठा करण्याचे आदेश दिले. आणि इथल्या रुग्णांना दिलासा दिला. युपी, दिल्लीप्रमाणे विदारक चित्र महाराष्ट्रात पहायला मिळालं नाही.
मुख्यमंत्र्यांनी कोरोना घालवण्यासाठी टाळ्या-थाळ्या वाजवायला सांगितल्या नाहीत की गो कोरोना गो च्या घोषणा देत बसले नाहीत.
राज्य अडचणीत आहे, राज्यातील जनता गोंधळात आहे अशावेळी त्यांनी थेट जनतेशी संवाद साधून मार्गदर्शन केले. आणि सामान्य माणसाच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला.
सर्वसामान्यांना धीर देणे, आपत्तीच्या वेळी त्यांच्या पाठीशी उभे राहणे, संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य देणे.
हा तुमचा हिंदुत्वाचा ब्रँड नाही का??
महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षात...
जातीय तेढ नव्हती
दंगल झाली नाही.
कुठल्याही विशिष्ट धर्माची पाठराखण करण्यात आली नाही.
सर्वांना समान वागणूक दिली गेली
जात, धर्म कुठलीही असली तरी प्रत्येकाला आमच्या राज्यात सुरक्षित वाटले.
समानता, बंधुता, स्वातंत्र्य, सुरक्षितता
हा तुमचा हिंदुत्वाचा ब्रँड नाही का?
दरम्यान तुम्ही ज्या पक्षाशी जोडले जाण्यासाठी उत्सुक आहात त्या पक्षाचे शासन असलेल्या राज्यांमध्ये…
मुस्लिमांना त्यांच्या खाण्यावरुन मारले गेले.
महिलांचा कपड्यांवरुन छळ केला गेला.
दलितांना जीपला बांधून लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली.
लग्नाची वरात विशिष्ट विचाराच्या व्यक्तिंना आवडत नाहीत म्हणून दलितांना गोळ्या घालण्यात आल्या.
मुक्त व्यासपीठावरुन द्वेषपूर्ण भाषणं करण्यात आली.
केवळ मुस्लिम असल्याच्या कारणावरुन लाईव विडीयोमध्ये जाळून मारण्यात आले.
धर्मासाठी लोकांच्यी हत्या झाल्या, महिलांचा छळ करण्यात आला, अल्पसंख्यांकांना मारहाण करण्यात आली.
हाच तुमचा हिंदुत्वाचा ब्रँड आहे का?
मी शिवसैनिक नाही की महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही.
माझा जन्म या राज्यात झाला, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ऐकत मी वाढलो आहे.
ते शिवाजी महाराज मुघलांविरुध्द लढले मुस्लिमांविरुध्द नाही.
त्याच शिवाजी महाराजांना धर्माचा, जातीचा विचार न करता सर्वांना सोबत घेतले.
त्या शिवाजी महाराजांनी न्याय देताना माणसामाणसांमध्ये भेदभाव नाही केला.
तेच शिवाजी महाराज ज्यांना शत्रू घाबरत होते, पण प्रजा मात्र प्रचंड प्रेम करत होती.
तेच शिवाजी महाराज ज्यांना गुजरातमध्ये जन्मलेल्या औरंगजेबाची ‘चाकरी’ करण्यास नकार दिला होता. चाकरी करुन मिळणाऱ्या ऐश्वर्यावर लाथ मारत महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी लढणे पसंत केले होते.
तुम्ही ज्या हिंदुत्वाच्या गोष्टी करताय, करायला जात आहात,
त्या हिंदुत्वाची छत्रपती शिवाजी महाराजांना गरज नव्हती.
तर, मी पुन्हा विचारतो.
तुमचा हिंदुत्वाचा ब्रँड नेमका काय आहे????
तुमचा विनम्र गोंधळ,
दर्शन मोंडकर
एक ठाणेकर, एक महाराष्ट्रीयन, एक भारतीय
जय हिंद, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
सुचनाः हा प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला असून त्यांनी स्वतःच याचे उत्तर द्यावे, अशी विनंती आहे. देवेंद्र फडणवीस यांची याकरिता मदत घेऊ नये. नो चिटींग, ठिक आहे?
दर्शन मोंडकर ✒️
0 Comments