Ticker

6/recent/ticker-posts

*वाघिन गुरगुरली: वाघाचा त्वरित बंदोबस्त करा; अन्यथा जंगल पेटवू-माजी मंत्री शोभाताई फडणवीस*



जनवार्ता भारत डॉट कॉम
मुल : तालुक्याच्या विविध भागात वाघाच्या हल्यात आतापर्यंत तेरा निष्पाप जीवांचा बळी गेला असुन अनेक जनावर ठार झाली आहेत. त्यामूळे यापुढील काळात अश्या घटनांवर प्रतिबंध आणण्यासाठी वनविभागाने उपाययोजना करावी. अन्यथा जंगल पेटवुन देवु. असा इशारा उद्या होणाऱ्या जिल्हाधिकारी यांचे सोबतच्या बैठकीत देणार असल्याचे मत माजी मंञी शोभाताई फडणवीस यांनी व्यक्त केले.
नुकत्याच घडलेल्या करवन-काटवन परीसरातील वाघाच्या हल्याच्या घटनेमूळे संतप्त झालेल्या शोभाताई फडणवीस स्थानिक पञकारांशी बोलत होत्या. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या संरक्षणासोबतच अन्य काही बाबी साध्य करण्यासाठी शासनाने बफर झोन क्षेञ जाहीर केले. असे करतांना नियमानुसार बफर झोन क्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या संबंधित ग्राम पंचायतीची परवानगी असल्याबाबत ग्राम सभेचा ठराव आवश्यक होता, त्यामूळे वनविभागाने बफर झोन क्षेत्रात येणाऱ्या ९३ गांवाशी संपर्क साधुन परवानगी संदर्भात पाठपुरावा केला. परंतु ९३ पैकी ९० ग्राम पंचायतीनी बफर झोनचा प्रखर विरोध दर्शवत तसा ठराव केला तर ३ ग्राम पंचायतींनी अजुनही ग्राम सभेचा ठराव वनविभागाला दिलेला नाही. तरीसुध्दा वनविभागाने बळजबरीने ९३ गांव बफर झोन मध्ये समाविष्ठ केली. हा प्रकार त्या त्या गावांवर अन्याय करणारा आहे. असे मत व्यक्त करतांना शोभाताई फडणवीस यांनी वनविभागाच्या या तुघलकी कारभारामूळे ग्रामस्थ हैरान झाले असल्याचा आरोप केला. तालुक्याच्या विविध भागात घडलेल्या वाघाच्या हल्याच्या घटनेत आजपर्यंत तेरा व्यक्तीचा नाहक बळी गेला. ज्या गावांतील व्यक्तींचा वाघाने बळी घेतला त्या परीसराचा अभ्यास आणि ग्रामस्थांशी चर्चा केली तेव्हा असे निदर्शनास आले की, अनेक गांवालगत मोठ्या प्रमाणात झुडुप वाढली आहेत. शिवाय वन्यप्राण्यांना तहान भागविण्यासाठी जंगलात पाहीजे त्या प्रमाणात पाणवठे निर्माण केलेली नाहीत. जी पाणवठे आहेत त्या ठिकाणी पुरेशे आणि नियमित पाणी साठवुन ठेवल्या जात नाही. त्यामूळे तहाणेने व्याकुळ झालेले वन्यप्राणी पाण्याच्या शोधात वणवण भटकत गांवात येवु लागली आहेत. बफर झोन परीसरातील वाघांचीही काहीशी हीच अवस्था आहे. पाण्याच्या शोधात वाघ गांवाजवळ येवु लागले असुन गांवालगतच्या वाढलेल्या झुडपात आश्रयाला बसलेल्या वाघांकडून कधी शौचास तर कधी शेतात जाणाऱ्या मानवांवर जीवघेणे हल्ले होवु लागले आहेत. वाघांचे जतन आणि संवर्धन करण्याची योजना राबवतांना माञ वनविभागाच्या दुर्लक्षामूळे मानवाला वाघाचे खाद्य व्हावे लागते. ही शोकांतीका आहे. त्यामूळे यापुढील काळात तालुक्यात वाघाच्या हल्याच्या घटना घडु नये. म्हणुन वनविभागाने ठोस प्रतिबंधक योजना राबवावी. अन्यथा जंगल पेटवु. असा निर्धार आता ग्रामस्थांनी केला आहे. याअनुषंगाने ३ जुन रोजी आपण शेतकरी आणि ग्रामस्थांना सोबत घेवुन जिल्हाधिकारी आणि पालकमंञी यांची भेट घेणार असुन सदर भेटीत मानव संरक्षणाचे ठोस निर्णय घेतल्या जाईल. अशी अपेक्षा आहे. अन्यथा ग्रामस्थांनी जे ठरवल ते करून दाखवतील. असा इशारा शोभाताई फडणवीस यांनी दिला आहे. यावेळी न.प.चे माजी उपाध्यक्ष अनिल संतोषवार आणि बाजार समितीचे माजी सभापती मोतीलाल टहलीयानी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments