जगदीश का. काशीकर
चिपळूण : भात पेरणीच्या कामासाठी पॉवर ट्रिलर चालवत असताना दोन्ही पाय सटकून ते पॉवर ट्रिलरच्या नांगरामध्ये अडकले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा डेरवण हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना मांडकी येथे घडली. महेंद्र पांडुरंग मोरे (वय-३४, मांडकी) असे मृत्यू शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, मांडकी गावचे हद्दीत हिरु खांबे व महेंद्र मोरे हे शेतामध्ये मिनी पॉवर ट्रिलरने भात पेरणी व नांगरणी करीत होते. भाताची पेरणी व नांगरणी झाल्यानंतर महेंद्र हे दुसऱ्या शेतामध्ये पॉवर ट्रिलर नेत होते. यावेळी शेताच्या बांधांवरून पॉवर ट्रिलर खाली उतरत असताना इंजिनाच्या लोडमुळे पॉवर ट्रिलर हॅन्डल वरच्या बाजुला उचलले गेले. त्यामुळे हॅन्डल खाली करण्यासाठी महेंद्र हे हॅन्डलवर उभे राहून पायाने हँडल खालील बाजूस दाबण्याचा प्रयत्न करीत होते.



0 Comments