Ticker

6/recent/ticker-posts

*💥 टकलू बाबांसाठी आशेचा किरण; सहा महिन्यात उगवणार केस*




केस गळण्याच्या समस्येला वैद्यकीय भाषेत एलोपेशिया अरेटा म्हणतात. एलोपेसिया अरेटा हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे ज्यामध्ये केसांच्या कूपांवर चुकून रोगप्रतिकारक शक्तीचा हल्ला होतो, ज्यामुळे केस गळतात.

आजच्या युगात केस गळती ही एक सर्वसामान्य समस्या आहे. नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) नुसार, युकेमधील वेगवेगळ्या वयोगटातील प्रत्येक 10,000 लोकांपैकी 15 लोकांवर अशा पद्धतीनं केस गळतीचा परिणाम होत असल्याचा अंदाज आहे. काही लोकांमध्ये ठराविक भागातीलच केस गळतात आणि त्यांचे केस नैसर्गिकरित्या परत वाढू शकतात. परंतु, इतर प्रकारातील लोकांमध्ये डोक्यावरील सर्व केस गळून पडतात. या स्थितीवर कोणताही इलाज नाही, परंतु काही औषधे पुन्हा केसांची वाढ करण्यास मदत करू शकतात.

अभ्यास कसा झाला?

फार्मास्युटिकल कंपनी कॉन्सर्ट फार्मास्युटिकल्सने (Concert Pharmaceuticals) यूएस मधील 706 लोकांची निवड केली ज्यांना मध्यम ते गंभीर एलोपेशिया एरियाटा आहे. ते तीन गटांमध्ये विभागले गेले होते, एका गटाला दिवसातून दोनदा 8 मिलीग्राम टॅब्लेट देण्यात आली होती, दुसऱ्या गटाला 12 मिलीग्राम दिवसातून दोनदा डोस दिला गेला होता आणि तिसरा गट प्लेसबोवर ठेवण्यात आला होता. प्लेसबो ही एक अशी वैद्यकीय पद्धत आहे, ज्यामध्ये औषध वापरले जात नाही, परंतु रुग्णावर भ्रम निर्माण करून किंवा भावनांच्या आधारे उपचार केले जातात. म्हणजेच रुग्णाला गोळी किंवा 'नकली' इंजेक्शन दिले जाते जे औषधासारखे दिसते, परंतु प्रत्यक्षात ते औषध नसते.

अभ्यासात काय झाले -

डमी औषध घेणाऱ्या रुग्णांपेक्षा औषध घेणाऱ्या रुग्णांच्या डोक्यावर केस वाढू लागल्याचे दिसून आले. सुमारे 42 टक्के आणि 30 टक्के रुग्णांनी अनुक्रमे 12 मिग्रॅ किंवा 8 मिग्रॅ डोस घेतल्यावर त्यांचे केस किमान 80 टक्के किंवा त्याहून अधिक वाढलेले दिसतात. काही रुग्णांना डोकेदुखी आणि पुरळ यासारखे दुष्परिणाम देखील अनुभवले. एलोपेशिया औषधाच्या क्लिनिकल चाचण्यांचा हा अंतिम टप्पा होता, ज्याला CTP-543 असे नाव देण्यात आले. रँडमाइज्ड, डबल-ब्लाइंड आणि प्लेसीबो-कंट्रोल हे अभ्यासाचे सर्वोच्च मानक होते.

तज्ज्ञ काय म्हणतात -

अभ्यासात सामील असलेल्या येल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनचे त्वचाविज्ञानी डॉ. ब्रेट किंग म्हणाले, “अलोपेसिया एरियाटासाठी नवीन उपचारांना पुढे नेण्यात हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. CTP-543 सह पहिल्या टप्प्यातील 3 चाचणीचे असे सकारात्मक परिणाम पाहून मला खूप आनंद झाला आहे. या आव्हानात्मक आजारावर उपचाराची नितांत गरज आहे. THRIVE-AA1 चाचणीचे परिणाम असे सूचित करतात की CTP-543 संभाव्यत: एलोपेशिया एरियाटाच्या उपचारांसाठी एक महत्त्वपूर्ण थेरपी प्रदान करू शकते. CTP-543 मध्ये अ‍ॅलोपेशिया एरियाटा असलेल्या रुग्णांसाठी सर्वोत्तम उपचार प्रदान करण्याची क्षमता आहे, हा आजार दीर्घकाळ दुर्लक्षित आहे.”

त्याच वेळी, औषध फर्मला आशा आहे की औषध नियामक अन्न आणि औषध प्रशासन (FDA) CTP-543 ला मान्यता देईल, ज्यामुळे ते यूएसमधील एलोपेशिया एरियाटासाठी 'पहिल्यापैकी एक' उपचारांपैकी एक बनले आहे.

साभार.....

Post a Comment

0 Comments