Ticker

6/recent/ticker-posts

नवविवाहितेचा दुसऱ्याच दिवशी मृत्यू! हळत उतरवताना आली चक्कर




निफाड तालुक्यातील जळगाव येथील शरद भास्करराव वडघुले यांची कन्या पूजा हिचे लग्न वडनेर भैरव येथील रामराव भालेराव यांचा चिरंजीव चेतन भालेराव याच्याशी झाले. 10 मेला हा विवाहसोहळा अगदी थाटामाटात झाला.

नाशिक, 30 मे : काही वेळा नियती माणसावर असा घात करते, की त्याबद्दल शब्दही बोलायला फुटत नाहीत. नियतीचा क्रूरपणा अनेकांच्या नशिबी येतो. नियतीच्या क्रूरपणाची अशीच एक धक्कादायक समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे घडली. यामध्ये एका नवविवाहित तरुणीचा मृत्यू झाला आहे.

नेमकं काय घडलं -

पूजा उर्फ कांचन चेतन भालेराव या तरुणीचे लग्न (Wedding) झालं होतं. यानंतर लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी हळद उतरवताना तिला चक्कर आले. यानंतर तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा शनिवारी मृत्यू झाला. चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील भालेराव कुटुंबीय आणि निफाड तालुक्यातील वडघुले कुटुंबीयांना हा दु:खद अनुभव आला.

निफाड तालुक्यातील जळगाव येथील शरद भास्करराव वडघुले यांची कन्या पूजा हिचे लग्न वडनेर भैरव येथील रामराव भालेराव यांचा चिरंजीव चेतन भालेराव याच्याशी झाले. 10 मे रोजी हा विवाहसोहळा अगदी थाटामाटात झाला. मात्र, यानंतर दुसऱ्या दिवशी 11 तारखेला नवरीची हळद उतरवली जात होती. याचवेळी पुजाला चक्कर आले. यानंतर ती खालीच कोसळली. या घटनेने सर्वच जण भांबावले होते.

Post a Comment

0 Comments