Ticker

6/recent/ticker-posts

*घरकुलच्या अंतीम बिलासाठी नगरपंचायतीत घोंगावणारं 'हरिदास' नावाच वादळ शमलं* ▪️पोंभुर्णा नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभाराचा ठरला बळी




पोंभुर्णा : नगरपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक 1 मध्ये राहणारा सर्वांना परिचीत असणारा जेष्ठ नागरिक हरिदास खोब्रागडे यांचे रमाई घरकुल योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले. हरिदास यांनी आपल्या म्हातारपणात निवाऱ्याची सोय उभी करुन त्यात राहण्याचे स्वप्न सजविले होते. त्यांना घरकुलाचा केवळ पहिला हप्ता देण्यात आला होता. परंतु घर जवळपास पुर्ण टप्यावर पोहचले असतांना त्यांना पुढील टप्यांची रक्कम देण्यासाठी नगरप्रशासन कडून अडवणूक करण्याच्या माध्यमातून वेगवेगळी कारनं सांगण्यात येत होती. मात्र हरिदास यांनी सातत्याने घरकुलच्या हप्त्यासाठी सतत चेकपोंभुर्णा ते नगरपंचायत जवळपास दोन तिन किलोमिटर चा प्रवास उन्हातान्हात करुन वारंवार बिलाबद्दल विचारत होते. परंतु हरिदासचा हाक कुणीही ऐकली नाही. "नाही लोकप्रतिनिधी नाही नगरप्रशासन" यात तो मोठ्या चिंतेत पडला होता. बिलासाठी विचारांचे काहूर त्याच्या मनात पेटले होते. या पेटलेल्या विचारांतच, व नगरप्रशासना कडून टाळाटाळ करुन हुलकावण्या देण्याऱ्या शब्दांचे रान सतत त्याच्या मनात वणव्यात सारखे धगधगत होते. आता माझे घर पुर्ण होणार नाही या निराशेतच काळजात हुंदका आल्यागत चिंताचूर झालेलं मन बधीर झालं आणि घरकुलच्या बिलासाठी पायपिट करणारं हरिदास नावाचं वादळ जागीच शांत झालं. मात्र हरिदासच्या मागणीचा आवाज आजही नगरपंचायत भिंतीत घोंगावत आहे. साहेब माझ्या घरकुलचा हप्ता द्या. हा आवाज त्यांच्या मृत्यूनंतर थांबवण्यासाठी व त्यांना जेष्ठ नागरिक म्हणून श्रद्धांजलि देण्यासाठी नगरप्रशासन व लोकप्रतिनिधी पुढाकार घेऊन थकलेले पुढील हप्ते त्यांच्या वारसदार पत्नी यांच्या नावाने द्यावे. व हरिदास च्या स्वप्नात असलेले घर तयार करण्यास मदत करावी. अशी मागणी जनमानसात केली जात आहे.

Post a Comment

0 Comments