✍️ जनवार्ता भारत डॉट कॉम

नागभिड:- तहसील अंतर्गत येणाऱ्या नवेगाव हंडेस्वरी येथील आडकुजी मारोती गेडाम वय ६० वर्ष हा सकाळी ७ वाजता तेंडू पत्ता तोडण्यायाकरिता शिवारातील जंगलात गेला असता दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हमला करून ठार केले.असे शेजारी तेंदूपाने तोडणाऱ्याच्या लक्षात येताच गावात माहिती देण्यात आली. लगेच वन विभाग नागभिड येथे माहिती देण्यात आली. वन परिक्षेत्र अधिकारी डॉ. महेश गायकवाड व त्यांची चमू घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय नागभिड येथे पाठविण्यात आले. शवाचे शवावीच्यादन करून शव कुटुंबीयांना देण्यात आले असून वन विभागाच्या वतीने अंत्यसंस्कार करिता सानुग्रह अनुदान देण्यात आले. यानंतर शासकीय धोरणानुसार आर्थिक मदत देण्यात येईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ महेश गायकवाड यांनी सांगितले. या घटनेमुळे तेंदू संकलन करणाऱ्या मधुराम मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.