Ticker

6/recent/ticker-posts

: मूल येथे सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न:परिसरात विवाह मेळाव्याची चर्चा


मूल- 1873 साली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराने सुरू झालेली सत्यशोधक विवाहाची परंपरा आजही जपली जात आहे. मूल तालुक्यातील रत्नापुर येथे असाच कर्मकांडाला फाटा देत महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून समस्त मानवपंचाच्या साक्षीने सत्यशोधक विवाह सोहळा हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पडला.
डोंगरहळदीतील सौ. शेवंताबाई व श्री. शत्रूघन लेनगुरे यांचे चिरंजीव सोनल आणि रत्नापुरातील सौ. रेखाताई श्री. सुखदेव वाडगुरे यांची सुकन्या अनुराधा यांनी महात्मा ज्योतिबा फुले - ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांना वंदन करून त्यांनी दिलेल्या विचारांची कास धरून सत्यशोधक पद्धतीने विवाह करून सहजीवनाचा आयुष्याची सुरुवात केली. महापुरुषाच्या प्रतिमेला वंदन करून आयुष्यभर साथ देण्याची शपथ अनुराधा व सोनल यांनी घेतली. ओबीसी समाजातील पुरोगामी विचाराचे अभ्यासक डॉ. राकेश गावतुरे यांनी रत्नापुरात लेनगुरे-वाडगुरे यांच्या अपत्याचा विवाह सत्यशोधक पद्धतीने झाला पाहिजे म्हणून मार्गदर्शन केले त्या विचाराने प्रेरित होऊन वरवधूच्या कुटुंबातील मुख्य मंडळींनी सत्यशोधक विवाह करण्याचा निर्णय घेतला.
महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांना प्रथमतः अभिवादन करण्यात आले. कोणताही मुहूर्त नाही, अक्षदा नाही. केवळ महापुरुषांनी मानवाच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याची आठवण करीत विचारांचे अमृत पाजत महात्मा ज्योतिबा फुले रंजित मंगलाष्टके म्हणून अनोख्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी दोन्ही कुटुंबांनी एकमेकांचा सत्कार करण्यात आला. डॉ. समीर कदम यांनी सत्यशोधक पद्धतीने लावले व उपस्थितांना माहिती दिली. यावेळी वधुवरकडील पाहुणे मंडळी व श्रीकांत शेंडे, विजय ढोले, जनार्धन लेनगुरे, विकास टिकडे, रोहित निकुरे, डॉ. दीपक जोगदंड आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. सध्या या विवाहाची चर्चा रत्नापुर व मूल परिसरात होत आहे.

Post a Comment

0 Comments