Ticker

6/recent/ticker-posts

आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी जूनगावचा कायापालट केला: माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भाऊ भोंगळे यांचे प्रतिपादन




पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी
बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थ व नियोजन मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी जुनं गावच्या विकासासाठी शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी तिला आहे. जुनी गावच्या जनतेने सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे वर प्रेम दाखवील तसाच प्रेम सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी दाखवून गावाचा कायापालट केला असल्याचे मत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भाऊ घोंगडे यांनी व्यक्त केले.
ते पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव येथील आमदार चषक 2022 खुल्या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले जुन्या गावच्या बुडीत मुलाची समस्या लक्षात घेऊन आमदार महोदयांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे शि वार्तालाप करून मोठ्या पुलास मंजुरी मिळवून दिली लगेचच या पुलाच्या बांधकामास सुरुवातही होणार आहे. त्याच प्रमाणे वैनगंगा नदीच्या मोठ्या प्रवाहावर मोठ्या मुलास सुद्धा मंजुरी मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जगदंब क्रिकेट क्लब जुनगाव च्या वतीने सोमवार दिनांक 28 मार्च 2022 पासून इंद्रायणी स्टेडियम वर आयोजित केले आहेत. इंद्रावन मेश्राम, भाऊजी गेडाम, सुरेश मेश्राम, भास्कर गेडाम, जीवनदास गेडाम यांच्या भव्य पटांगणावर सदर खुले क्रिकेट सामने सुरू आहेत. प्रथम पुरस्कार 71 हजार एक रुपये असून द्वितीय एक्केचाळीस हजार एक तर तृतीय वीस हजार एक असे बक्षीस ठेवण्यात आले आहेत.
सदर कार्यक्रमाची संकल्पना व सामान्यांची नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करण्याची जिद्द असलेल्या जुनगाव येथील उपसरपंच राहुल भाऊ पाल यांच्या पुढाकाराने सदर सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती अलका आत्राम, माजी उपसभापती विनोद भाऊ देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रविभाऊ मरपल्लीवार, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष निलेश भाऊ चिंचोळकर, भाजपा युवा मोर्चाचे अजय भाऊ मस्के, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष राहुल भाऊ पाल, शिवसेना तालुका उपप्रमुख जीवनदास गेडाम, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन येलपुरवार, सेवानिवृत्त ग्रामपंचायत कर्मचारी पांडुरंग जी पाटील पाल, खुशाल भोयर, गुरुदास चुधरी, हेमंत आरेकर उपसरपंच देवाडा बुद्रुक, नेहरू मोरे, जालिंदर बांगरे सरपंच बोंडाळा, विश्वेश्वर भाकरे, रेवनाथ मिसार, माधुरी प्रकाश झभाडे, पल्लवी किशोर देशमुख, व प्रतिष्ठित पाहुणे मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments