गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम यांच्या आहेरी स्थित बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून तैनात असलेल्या सुरक्षा जवानाने स्वतःच्या रिवाल्वर मधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज दिनांक 25 एप्रिल रोजी घडली.
लोकेश भैसारे असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव असून त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास पोलिस करीत आहे.


0 Comments