Ticker

6/recent/ticker-posts

सामाजिक समता सप्ताहानिमित्त कार्यक्रम संपन्न

सामाजिक समता सप्ताहानिमित्त कार्यक्रम संपन्न

   चंद्रपूर:-सर्वोदय शिक्षण मंडळा द्वारा संचालित स्व. सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली ,चंद्रपूर प्राचार्य डॉ. सुनील साकुरे यांच्या नियंत्रणात व प्रा. डॉ. प्रगती नरखेडकर यांच्या मार्गदर्शनात एम. एस. डब्ल्यू .चतुर्थ सेमिस्टर सामुदायिक विकास या विशेषीकरणातील विद्यार्थ्यांनी लुम्बिनी बुद्ध विहार माता नगर भिवापुर वॉर्ड, चंद्रपूर येथे सामाजिक समता सप्ताह निमित्य कायदेविषयक मार्गदर्शन, आरोग्य तपासणी,कोविड लसीकरण शिबिर व चाईल्ड लाईन हेल्पलाईन 1098 विषयी मार्गदर्शन तसेच बाँ.राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मुतिदिनानिमित्त आदरांजली कार्यक्रम पार पाडला.
         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिवापूर वार्डाच्या नगरसेविका माननीय सौ. मंगला आखरे, कायदेविषयक मार्गदर्शक माननीय एडवोकेट योगेश्वर पचारे ,आरोग्यविषयक मार्गदर्शक माननीय डॉक्टर मयूर ताकसांडे व प्रमुख अतिथी म्हणून लुंबिनी बुद्धविहाराचे अध्यक्ष माननीय हनुमानजी चांदेकर, माननीय राजेंद्र आखरे उपस्थित होते .कोविड लसीकरण, आरोग्य तपासणी व मार्गदर्शनाचा समुदायातील सुमारे 30 ते 40 लोकांनी लाभ घेतला. त्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माननीय डॉक्टर विजया खेरा(मेडिकल ऑफिसर )व त्यांचा चमू, माननीय हनुमानजी चांदेकर सर तसेच कार्यक्रमाला उपस्थित सर्व प्रमुख अतिथी ,समुदायातील लोकांनी सहकार्य केले.आयोजनाकरीता कुमारी अंकिता, प्रतीक्षा,ऋतुजा ,प्रांजली ,प्रियंका, मुकुल, अक्षय ,प्रदीप ,अमरदिप यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन कुमारी अंकिता देशेट्टीवार तर आभार कुमारी प्रियंका चुनारकर यांनी केले.

Post a Comment

0 Comments