Ticker

6/recent/ticker-posts

*वाघाच्या हल्यात गाय ठार* *गोरगरीब शेतकऱ्यांस आर्थिक भुर्दंड*, *वनविभागाच्या वतीने आर्थिक मदत मिळेल काय ? नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न* - *हळदी माल जंगल परिसरात वाघाची दहशत; जनजीवन विस्कळीत*



चामोर्शी:-सुखसागर झाडे.

चामोर्शी तालुक्यातील मौजा हळदी माल येथे आज दुपारच्या ३ वाजेच्या सुमारास हळदी माल जंगल परिसरास गाय बैलांच्या कळपाला चारायला गुराख्याने नेले होते. दैनंदिन नित्यनियमा प्रमाणे दुपारच्या ३ वाजेच्या सुमारास लागुन असलेल्या वैनगंगा नदीवर पाणी पाजायला गायीचे कळप गुराखी घेऊन जात असताना अचानक जंगलात दडी मारुन असलेल्या वाघाने अचानक गायीवर मागून हल्ला केला या हल्यात गायीचा जागीच मृत्यू झाला. सदर दृश्य गुराख्याने बघताच गुराख्याने पळ काढला आणी झालेल्या घटनेची माहिती गावातील लोकांना संपर्क साधून कळवले काही वेळात लोकांचा जमाव घटनास्थळा वर होण्या आधीच वाघाने घटना स्थळावरून पलायन केले होते.घटनेस्थळी गायीचा मागील भाग वाघाने फस्त केले होते. दरम्यान गायीचा जागीच मृत्यू झाला. सदर गाय हि श्री. रूपचंद नारायण दुर्गे हळदी माल यांची आहे.सदर घटनेची माहिती हळदी माल येथील वनरक्षक जुवारे यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून सुद्धा सदर मोका चौकशी करण्यासाठी वनरक्षक जुवारे हे घटनास्थळी आले नसल्याचे नुकसान ग्रस्त गाय मालक यांचे म्हणने आहे.संबंधित अधिकारी बेजबाबदार पणा करीत असणार तर गोरगरीब आर्थिक नुकसान ग्रस्त जनसामान्य लोकानी कुणाकडे दाद मागायची असा मोठा गहन प्रश्न उपस्थित झाला आहे.सदर घटनेमुळे आजुबाजूच्या परीसरातील लोकात वाघाच्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने वाघाला जेरबंद करावे व नुकसान ग्रस्तात आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा नुकसान ग्रस्त गाय मालकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments