Ticker

6/recent/ticker-posts

अतिवृष्टी नुकसानभरपाई निधी तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा- हकानी शेख 🌐 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा ( सय्यद शब्बीर जागीरदार




( सय्यद शब्बीर जागीरदार )

जिवती:- जिवती तालुका हा डोंगराळ भाग असल्याने या तालुक्यातील एक मात्र मुख्य व्यवसाय शेती असुन शेतीवरच उदरनिर्वाह चालतो.कोरडवाहू शेती असल्याने या भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या पावसावर अवलंबून राहावे लागते आणि या वर्षी पावसाने शेतकऱ्यांवर कहरच केला खुप अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेतीतील उभ्या पीकांचे आतोनात नुकसान झाल्यामुळे महाविकास सरकारने महाराष्ट्रा सहीत जिवती तालुका हा अतिवृष्टी जाहीर करण्यात आले आणि शेतकऱ्यांचे पंचनामे करून सरसकट नुकसानभरपाई निधी देण्यात यावे असे जाहीर केले.जिवती तालुक्यातील काही साजाच्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात निधी जमा झाली.तालुक्यातील काही साज्याचे शेतकरी नुकसान भरपाई निधी पासून वंचित आहेत तात्काळ उर्वरित साज्याच्या शेतकऱ्यांचा खात्यात नुकसान भरपाई निधी तात्काळ जमा करावी. नुकसानभरपाई निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही झालीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिवती तालुक्याच्या वतीने दिनांक २४ मार्च रोजी तहसील कार्यालयाच्या समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असा इशारा तहसीलदारांना निवेदनाद्वारे हकानी शेख मनसे तालुकाध्यक्ष यांनी दिला

Post a Comment

0 Comments