Ticker

6/recent/ticker-posts

*▪' व्हाईट हाॅऊस ' ला लागले घनकचऱ्याचे ग्रहण..* *▪नगराध्यक्षाने पतीच्या नावे असलेल्या स्वतःच्या शेतात टाकले कंपोस्ट खत..* *▪शिवसेनेचा पत्रपरिषदेतून सनसनाटी आरोप..*



*पोंभूर्णा/१० मार्च.*

' व्हाईट हाॅऊस 'चे प्रतिरूप म्हणून निर्मित केलेली नगर पंचायत इमारत जरी सुधिर मुनगंटीवार यांच्या विकास कामाची धडाडी दाखवत असली तरी नवनियुक्त विश्वासू नगराध्यक्षाच्या पतीने या व्हाईट हाॅऊस वर कंपोस्ट खत फस्त करून मोठ्ठा डाग लावल्याचे निदर्शनास येत आहे.नगराध्यक्षाने आपल्या जवळीक नामक या व्यक्तीने स्वतःच्या विश्वासू इसमाद्वारे कोणतीही शासकीय प्रक्रिया पार न पाडता कंपोस्ट खताची परस्पर विल्हेवाट लावली आहे. नगराध्यक्षा पदाचा पदभार सांभाळताच लागलीच कंपोस्ट खताचा घोटाळा करून कर्तव्यदक्षतेची चुनूक दाखवली असुन  सदर प्रकरणाची योग्य चौकशी करावी, दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा व नगराध्यक्षानी स्वतःच्या स्वार्थासाठी नगरपंचायतीच्या मिळकतीला चुना लावल्यामुळे यांना पदावरून हटविण्यात यावे, समंधीत अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा शिवसेना तिव्र आंदोलन उभारेल असा इशारा शिवसेना गटनेते आशिष कावटवार, नगरसेवक अभिषेक बद्देलवार, रामेश्वरी वासलवार, बालाजी मेश्राम, गणेश वासलवार यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे. 

नगराध्यक्षा सुलभा पिपरे यांच्या  आपल्या पतीच्या नावे असलेली शेती गुरूदास पिपरे पोंभूर्णा हद्दीत भुमापन क्रमांक १०७५/५ आराजी ०.४३ हेआर. शेतजमीन आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्षा पदभार सांभाळताच त्यांना घनकचरा व्यवस्थापनात शेकडो ट्रॅक्टर कंपोस्ट खत मागील तिन वर्षापासून पडून असल्याचे निदर्शनास आले. यापूर्वीच्या नगराध्यक्षाने अडिच वर्षाच्या कालावधीतील कंपोस्ट खत मोठ्या पिशव्यांमध्ये भरून नगरपंचायतच्या इमारतीत जमा केला होता. परंतु या महाशयांनी सर्व नियम, अटी, करारनामा बाजूला सारून,घनकचरा व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन ,तिन वर्षापासून जमा असलेला कंपोस्ट खत स्वतःच्या शेतीत रिचवला. या करिता त्यांनी आपल्या विश्वासू सहकाऱ्याची ट्रॅक्टर लावून दिवसरात्र दोन दिवसात संपूर्ण कंपोस्ट खत उचल करून मैदान मोकळे करून सोडले. 

नगरपंचायतच्या स्थायी समिती सभा दिनांक ११ सप्टेंबर २०१९ च्या ठराव क्रमांक १/१ व करारनामा दिनांक १३ सप्टेंबर २०१९ नुसार घनकचरा व्यवस्थापन केंद्रावर घनकचऱ्याचे वर्गीकरण करून कचऱ्याचे कंपोस्टींग  किंवा वर्मीकंपोस्टींग करून खत निर्मिती करणे व नगरपंचायत द्वारे पुरविलेल्या बॅग मध्ये साठवून न.पं.ला जमा करणे तसेच निरुपयोगी कचऱ्याचे शास्त्रीय पध्दतीने लॅन्ड फिलींग करणे बंधनकारक आहे. नगरपंचायत कडून याची निविदा काढून विक्री करणे अपेक्षित आहे. याकरिता नगरपंचायतने पहिल्या वर्षी ५३,९९,०००/-रूपये, दुसऱ्या वर्षी ५८,९८,०००/-रुपये तिसऱ्या वर्षी ६४,८५,०००/-रुपये खर्च केले असून उत्पन्नावर मात्र नगराध्यक्षाच्या यजमानांनी डल्ला मारला आहे. 

आमदार सुधिर मुनगंटीवार यांच्या विकास कामांचे दाखले देत दुसऱ्यांदा नगरपंचायत मध्ये दाखल झालेल्या भाजपाच्या नगरसेवकातून अत्यंत विश्वासू म्हणून तन-मन आणि धनानी पक्षाची सेवा करण्याचे अभिवचन देवून सुलभा पिपरे नगराध्यक्ष पदी आरूढ झाल्या खऱ्या, परंतु यजमानाचे हे चौर्यकृत्य त्यांच्या पदाला ग्रहणच ठरत आहे. तेंव्हा या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, नगराध्यक्षांना पदावरून हटविण्यात यावे, तसेच समंधीत अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागण्यांच्या पूर्ततेकरीता एक आठवडा वाट पाहून  शिवसेना जन आंदोलन करेल असा इशारा शिवसेना गटनेते आशिष कावटवार आणि त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी दिला आहे. 🔅
================================

Post a Comment

0 Comments