Ticker

6/recent/ticker-posts

१२ हजाराची लाच घेताना तलाठी अडकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागा च्या जाळ्यात* *महसूल विभागाच्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह*



गडचिरोली:- सुखसागर झाडे.

गडचिरोली :महसूल विभागातील महत्वाचा घटक मानल्या जाणाऱ्या एका तलाठी आज दुपारी लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात, लाच लूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. शेतजमीनीचे फेरफार करण्याकरिता एका शेतकरी व्यक्ती कडून १२ हजार रूपयांची लाच स्विकारल्या प्रकरणी गडचिरोली तालुक्यातील येवली येथील पटवारी महेश भिमराव गेडाम (४०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

विश्वस्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना आपल्या सुनेच्या नावे खरेदी केलेल्या शेत जमीनीचे फेरफार करून देण्यासाठी पटवारी महेश भिमराव गेडाम यांनी,मंडळ अधिकारी यांच्या नावाने १० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. परंतु तक्रारदार शेतकऱ्याला लाच देण्याची कोणतीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथे तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारिच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथील अधिकाऱ्यांनी शहानिशा करत नियोजनबध्द सापळा रचला होता.

आज ३ मार्च रोजी तलाठी महेश गेडाम यांनी १२ हजार रुपयांची पंचासमक्ष मागणी करून १२ हजार रूपये स्विकारून,लगेच मुजोरीने आपल्या चारचाकी वाहनाने पळ काढला असतांना, गडचिरोली ते चंद्रपूर रोडवरील कनेरी नाक्याजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पाठलाग करून पकडावे लागले होते हे विशेष...

आरोपी पटवारी महेश गेडाम यांच्याविरूध्द गडचिरोली पोलीस स्टेशन येथे लाच प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक सुरेंद्र गरड यांच्या नेतृत्वाखाली, सफौ प्रमोद ढोर, पोहवा नथ्थु धोटे, नापोशि किशोर जौंजाळकर, श्रीनिवास संगोजी, राजु पदमगिरवार, स्विप्निल बांबोळे, पोशि किशोर ठाकुर, संदिप घोरमोडे, संदिप उडाण, मपोशि विद्या म्हशाखेत्री, जोत्सना वसाके व पोहवा तुळशिराम नवघरे यांनी भाग घेतला होता.


Post a Comment

0 Comments