Ticker

6/recent/ticker-posts

*तारसा बूज येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा* *शिवभक्तांनी महाराजांना केले अभिवादन*




गोंडपिपरी:-प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध उत्सव आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारीला महाराष्ट्रभर साजरा केला जातो.
गोंडपीपरी तालुक्यातील तारसा बूज येथे शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शिवभक्तांनी शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करण्यात आला. 
यावेळी व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा. आकाश कडूकर, प्रमुख अथिति सुनिल फलके, अतुल जंम्पलवार,  ग्रा.पं. सदस्य निकेश बोरकुटे, माजी उपसरपंच अमित फरकडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रावण निखाडे, उद्घाटक प्रकाश फरकडे, माणिकचंद उराडे, बंडू उराडे,राजकपूर भडके, सचिन बोरकुटे सह अन्य पाहुण्यांची उपस्थिती होती. 
 उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर प्रकाश टाकला.
यावेळी आयोजक समितीचे पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments