*पोंभूर्णा/१५ फेब्रुवारी.*
- पोंभूर्णा शहरात माळी समाजाचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. माळी समाज मोठा समाज आहे.२०२१-२२ च्या नगरपंचायत निवडणुकीत माळी समाजातून तीन उमेदवार भाजपा कडून निवडून आलेत.माळी समाजाने आजपर्यंत भाजपाला सहकार्य केले होते.अर्थातच पोंभूर्ण्यातील माळी समाज भाजपाच्याच दावणीला बांधलेला राहीला आहे. यावेळी पोंभूर्णा नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला राखीव निघाली.यामुळे माळी समाजातील महिलेला नगराध्यक्ष पद मिळणार अशी शहरात चर्चा सुरू झाली होती. या रेसमध्ये नंदा कोटरंगे ह्यांच्या नावाची पसंती होती. पक्षानेही सुरवातीला नंदा कोटरंगे यांच्या नावाला झुकते माप दिले होते, मात्र नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या ऐनवेळी नंदा कोटरंगे यांना डावलून भाजपाने सुलभा पिपरे यांच्या नावाने दोन अर्ज दाखल केले. तर शिवसेनेनेही दोन अर्ज दाखल केले. पहिला अर्ज शिवसेनेच्या रामेश्वरी वासलवार यांचा तर दुसरा अर्ज भाजपाच्या नाराज असलेल्या नंदा कोटरंगे यांचा अर्ज दाखल केला मात्र आलेल्या चार अर्जाची पडताळणी करून नंदा कोटरंगे यांचा अर्ज अपात्र करण्यात आला. यावर शिवसेनेकडून आक्षेप नोंदविण्यात आला असून १५ फेब्रुवारीला यावर सुनावणी होणार होती. यावर काय निकाल आला, याचा तपशील प्राप्त झालेला नाही. त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.
*कोटरंगे यांची भाजपाशी वर्षानुवर्षे एकनिष्ठता..*
------------------------------------------------------------
-नंदा ऋषी कोटरंगे ह्या राजकीय क्षेत्रात अनेक वर्षांपासून सक्रिय होत्या,आजही आहेत. त्या ग्रामपंचायत सदस्य होत्या. जिल्हा परिषद निवडणुकही त्यांनी लढवली होती. निवडणुकीत अल्पमताने त्यांचा पराभव झाला होता. २०१५ च्या नगरपंचायत निवडणुकीत माळी समाजाने भाजपाला नकार दिला होता मात्र भाजपावर एकनिष्ठ असलेल्या नंदा कोटरंगे यांनी भाजपाची साथ न सोडता भाजपाकडूनच निवडणूक लढवली होती. अवघ्या १ मताने त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीत शहर अध्यक्ष असलेले ऋषी कोटरंगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने निवडणूक लढविली. यावेळी भाजपाने दहा जागा जिंकून बहुमत मिळविले आहे. कोटरंगे हे २५ वर्षांपासून भाजपासोबत एकनिष्ठ राहिले आहेत, मात्र ऐनवेळी नंदा कोटरंगे यांच्या नगराध्यक्ष पदासाठी कापलेला अर्ज बरेच काही सांगून जाणारा आहे. मात्र भाजपा या एकनिष्ठ कार्यकर्त्याकडे, त्याच्या निष्ठतेकडे कोणत्या नजरेने पाहते हा चर्चेचा विषय आहे.



0 Comments